उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
ब्युरो न्यूज: मतदान निर्णायक ठरणार आहे. घुसचे बिगुल वाजल्यापासून महायुती विरुद्ध मविआ असा मोठा सामना सामना करत आहे.
कोकणात शिंदे आणि भाजपा चे नेते नॉट रिचेबल ?
उद्या दिनांक ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली चालू आहेत. मनसे ने सुद्धा यंदा आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यातच भाजपचा मनसेला पाठिंबा..शिवसेना ही मनसेला पाठिंबा देणार असल्याचं सांगते आहे.मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.आता सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे जरी नसले तरी माहीमच्या जनतेचे मात्र लक्ष लागून राहणार आहे. कारण आपण कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढत आहोत असं वक्तव्य सरवणकर यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील यांचा यंदाच्या निवडणुकीत पाडा अथवा लढा असा फॉर्म्युला पाहायला मिळणार आहे की काय..मनोज जरांगे पाटील देखील आज आपल्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याची महत्वाची अपडेट्स आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे.सर्व उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी या ठिकाणी भेटण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.
सिंधुदुर्गात काय आहे परिस्थिती?
दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक उमेदवार शिवसेनेचे निलेश राणे आणि उबाठा उमेदवार वैभव नाईक तर अपक्ष उमेदवार वैभव नाईक यांच्यात तिरंगी लढत असणार आहे की अपक्ष उमेदवार वैभव नाईक हे आपली उमेदवारी मागे घेणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, दुसरीकडे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.कारण शिवसेनेचे दिपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब या अपक्ष म्हणून लढणार आहेत,तर भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे देखील अपक्ष म्हणून लढणार आहेत. दरम्यान विशाल परब यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे. कणकवली देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदार संघातून आ.नितेश राणे यांच्या विरोधात उबाठा चे उमेदवार संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.एकूणच यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे यात शंका नाही.