चालक जागीच ठार…
झाराप-पत्रादेवी महामार्गावर माश्यांची वाहतूक करणाराकंटेनर पलटी होवून चालक जागीच ठार झाला तर सुदैवाने क्लीनर बचावला. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रीज परिसरात घडला. चालकाचा झोपेमुळे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मोहम्मद आमिद अशरफ (वय ४२, रा. उडपी, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. तर सुलेमान हसन साहब (वय ४३) हा किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, झाराप पत्रादेवी महामार्गावर भरधाव वेगळा माशाचा कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या दरित जाऊन कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर जखमी झाला आहे. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रीज परिसरात घडला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.