पुढील १० दिवसांत घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु न झाल्यास पुढचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर
        वैभववाडी तालुक्यातील करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करूळ -गगनबावडा घाटात धडक देत जोरदार आंदोलन केले. कोण म्हणतो सुरु होणार नाय सुरु केल्याशिवाय राहणार नाय, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, घाटमार्गात एकेरी वाहतूक सुरू झालीच पाहिजे,निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,  कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन छेडण्यात आले.   गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. तारीख देऊनही घाट रस्ता सुरु केला जात नाही. आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही. परंतु पूर्ण रस्ता बंद ठेऊन रस्त्याचे काम करणे हे राज्यातील पहिले उदाहरण आहे. रस्ता बंद करूनही ठेकेदाराकडून अत्यंत धिम्या गतीने काम सुरु आहे आणि झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे आहे. पुढील तीन ते चार महिने तरी घाट रस्त्याचे काम पूर्ण होईल असे वाटत नाही त्यामुळे करूळ -गगनबावडा घाटरस्त्यावरून पुढील १० दिवसांच्या आत एकेरी वाहतूक सुरु करावी अन्यथा पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे असा इशारा  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला. शिवसेना नेत्यांनी घाट रस्त्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सोमवारी यासंदर्भात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. 
    वैभववाडी तालुक्यातील करूळ -गगनबावडा घाट रस्ता हा व्यापार उद्योगात वृद्धी करणारा आणि मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेला महत्वाचा घाटमार्ग आहे. गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा घाट रस्ता सुरु करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. त्यावेळी डिसेंबर २०२४ मध्ये हा घाट रस्ता सुरु करण्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी दिले होते. मात्र अद्याप पर्यंत हा घाट रस्ता सुरु झालेला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देऊन १७ जानेवारी २०२५ पर्यंत हा घाटमार्ग सुरु न झाल्यास १८ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार घाट रस्ता सुरु न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन छेडण्यात आले. 
      यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, युवासेना उपतालुकाप्रमुख  सचिन आचरेकर, माधवी दळवी, वैभववाडी येथील मनोज सावंत, यशवंत गवाणकर,शंकर कोकरे,सूर्यकांत परब,लक्ष्मण रावराणे, नितेश शेलार,गणेश पवार,रोहित पावसकर,पांडुरंग पांचाळ,संतोष पाटील,दीपक पवार,संतोष कडू,जयेश पवार,मानसी सावंत, मिलिंद आईर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.1
 / 
67


उद्या वैभव नाईक जरी पक्षात येत असतील तरी त्यांचे स्वागत करा #nileshrane #vaibhavnaik #rajanteli

बीजेपीमध्ये जे आहेत ते सगळे माझेच सहकारी आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #deepakkesarkar

निलेश राणे उभे आहेत ना १०० % मी निवडून येणार Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik #sindhudurg

कापा म्हणजे ? मर्डर करा ? एवढं सोपं आहे का ? निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #sindhudurg #kudal

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी  ACB कटिबद्ध #sindhudurg #acb

तुझ्या औकातीत रहा संजू परब यांचा विशाल परबांना थेट इशारा #sawantawadi #vishalparab #sanjuparab

खोटया गुन्हयात अडकवले वकीलांचा पोलिसांवर आरोप #sindhudurg #kudal #breakingnews

रणझुंजार मित्रमंडळ नेरूर व रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नरकासुर स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल #sindhudurg #kudal

तेर्से बांबर्डे मळावाडी येथील ब्रिजचे काम शंभर टक्के पूर्ण करणार- निलेश राणे Nilesh Rane #nileshrane

कोणी कोणाला काढलं तेच समजत नाही ! #rajthackeray

वाडी - वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा
1
 / 
67

 
	

 Subscribe
Subscribe









