मुंबई प्रतिनिधी: यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी चालू असताना आता त्यांच्या साथीला राज ठाकरेही आले आहेत.
भाजपा ला मनसे साथ देणार.मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
दरम्यान माहीम मधील विधानसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्याला भाजपा साथ देणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.