आमदार निलेश राणे यांनी घेतले युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या बाप्पाचे दर्शन

कुडाळ : कुडाळ-मालवणचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री. निलेशजी राणे साहेब यांनी आज युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री. सागर वालावलकर यांच्या वालावल येथील निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सरूप वाळके, साईराज दळवी यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर हे आमदार निलेशजी राणे यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आज आमदार निलेशजी राणे यांनी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी वालावलकर कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!