ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची घोषणा
परभणी: शासकीय कार्यालये. स्ट्रीट लाईट. पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर होणार असून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच धोरण असल्याचं सार्वजनिक आरोग्य. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत सांगितलंय. यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना दार धरण्यासाठी जावं लागणार नाहीये. आज राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ह्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. शासनाच्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या वेगवेगळ्या योजनाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. त्यानंतर त्यांनी ऊर्जा आणि आरोग्य विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेतली. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरोदर माता. इतर गरजू रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी 6 आरोग्य केंद्रांना आंबूलन्स देण्यात आल्या आहेत. या अंबुलन्सचे उदघाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. सदर अंबुलन्समूळे गरजू रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचून उपचार घेता येणार आहेत.













