कै. श्री. अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कुडाळ पिंगुळी येथे मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कुडाळ : आज दि.६ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ- पिंगुळी उत्कर्ष नगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने मित्र कै. श्री अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतमाता मंदिर कुडाळ पिंगुळी येथे जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कै. श्री अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या श्रद्धांजलीपर रक्तदान शिबिराचे हे ५ वे वर्षे होते. कै. श्री अरविंद आकेरकर हे मनमिळाऊ स्वभावाचे असून उत्कर्ष नगर येथील नवरात्र उत्सव असू देत किंवा परिसरातील अन्य सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असे. भारतमाता मित्र मंडळ कुडाळ पिंगुळी उत्कर्ष नगर यांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!