राजापूर: शहरानजीकच्या कोंढेतड धोपटेवाडी येथील शिवप्रेमी क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय गायमर्यादीत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये आयसीसी पन्हळे संघाचा पराभव करीत महालक्ष्मी उपळे संघाने विजेतेपद पटकाविले. दूर्गादेवी विल्ये, आणि शिवप्रेमी कोंढेतड यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या संघांना मांन्यवरांच्या हस्ते आकरर्षक चषक आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या झालेल्या बक्षिस वितरण समारंभाला माजी उपसरपंच अरविंद लांजेकर, माजी उपसरपंच सुभाष नवाळे, दैनिक तरूण भारते पत्रकार प्रकाश नाचणेकर, दैनिक सकाळचे पत्रकार राजेंद्र बाईत, व्यवसायिक ललित कदम, श्री. पवार, धोपटेवाडी प्रमुख वसंत धोपटे यांच्यासह मोठ्यासंख्येने शिवप्रेमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, क्रिक्रेटपटू उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील पस्तीत संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये आयसीसी पन्हळे विरूद्ध महालक्ष्मी उपळे या दोन संघा दरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. त्यामध्ये आयसीसी पन्हळे संघाचा पराभव करीत महालक्ष्मी उपळे संघाने विजेतेपद पटकाविले.विजेत्या संघाला माजी उपसरपंच श्री. लांजेकर यांनी प्रथम क्रमांक रोख रक्कम बक्षीस25 हजार 555 रूपये, ही स्वतः पुरस्कृत या मंडळासाठी केली होती, तसेच उपविजेत्या संघाला 15 हजार 555 रूपये, तृतीय क्रमांक विजेत्याला 3 हजार 333 रूपये आणि चतृर्थ क्रमांक विजेत्याला 2 हजार 222 रूपये आणि आकर्षक चषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्ध्येमंध्ये लक्षवेधी कामगिरी करणार्या खेळाडूंना मालिकावीर कुंदन कदम, सामनावीर सचिन शिवणेकर, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षत्रक विघ्नेश जड्यार, उत्कृष्ठ फलंदाज राजा सूद, उत्कृष्ठ गोलंदाज राज कदम यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी शिवप्रेमी क्रीडामंडळाच्या सर्व पदाधिकार्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी यांनी मेहनत घेतली.













