अस्मिता ॲथलेटिक लीगमार्फत घेण्यात आलेल्या गोळा फेक खेळ प्रकारात आर्या मिलिंद गावडे हिचे यश

अमित पाटकर सर यांचे लागले मार्गदर्शन

कुडाळ : खेलो इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट असोसिएशन अस्मिता ॲथलेटिक लीग मार्फत घेण्यात आलेल्या गोळाफेक प्रकारात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेची इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आर्या मिलिंद गावडे हिने उत्तुंग यश संपादन केले आहे. ७.३७ मीटर गोळा टाकत तिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिला प्रशिक्षक अमित पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!