शिवसेना तेर्सेबांबर्डे शाखा पुरस्कृत शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ तेर्सेबांबर्डे बांदिवडेकरवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न

AA आरवली संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

तळवणे संघ द्वितीय क्रमांकावर.

      

कुडाळ : शिवसेना तेर्सेबांबर्डे शाखा पुरस्कृत शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ तेर्सेबांबर्डे बांदिवडेकरवाडी आयोजित एक गाव एक संघ अशा प्रकारची खोली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाराप आडेली रोड मैदान तेर्सेबांबर्डे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, राजन भगत, दिनेश साळगावकर ,सचिन धुरी अनिकेत तेंडोलकर,बाळा सावंत, प्रवीण रेडकर उपसरपंच मंगेश गावकर अमित डिचोलकर हरी डिचोलकर अरुण सामंत बाळकृष्ण मांजरेकर गुरु पेंडूरकर सुदीन नार्वेकर प्रवीण मेस्त्री आदी शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

एक गाव एक संघ या स्पर्धेत AA आरवली या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाला रोख रुपये 15,000 व चषक देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी असलेल्या तळवणे संघाला रोख रुपये 10,000 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले इतर वैयक्तिक आकर्षक बक्षीस देण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस वितरण तालुका प्रमुख विनायक राणे, तालुका संघटक रोहित भोगटे युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत तेंडोलकर पिंगुळी शाखाप्रमुख सचिन पालकर रुपेश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले

error: Content is protected !!