आ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताह

दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व घावनळे ग्रामस्थ यांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२ मार्च ते १८ मार्च २०२५ या कालावधीत दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व घावनळे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून वाढदिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १२ मार्च ते १६ मार्च या कालावधीत – घावनळे, खुटवळवाडी (आईनमळा) येथे आमदार चषक २०२५

दिनांक १७ मार्च रोजी – रक्तदान शिबिर, घावनळे ग्रामपंचायत येथे

दिनांक १८ मार्च रोजी – गावातील सर्व शाळांमधील व अंगणवाडीतील मुलांना खाऊचे वाटप, गावातील सर्व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, ग्रामस्थांसाठी नेत्र तपासणी शिबिर

या कालावधीत दररोज ३ लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. तसेच विजेत्याला १ टी-शर्ट व ₹ ५००/- रोख रक्कम दिली जाणार आहे. शिवाय फायनल दिवशी १२ मार्च ते १५ मार्च या कालावधीतील लकी ड्रॉ विजेत्यांमध्ये १ लकी ड्रॉ काढून विजेत्याला मिक्सर भेट दिला जाणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!