धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नाही आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान विरोधक या गोष्टीचे राजकारण करत असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कोणताही आरोप अद्याप सिद्ध झाला नसल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचं मित्र किंवा नातलग नसतो. त्यामुळे सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.