संतोष हिवाळेकर पोईप
श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूलच्या मैदानावर शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मसुरे तालुका मालवण प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.खो खो,कबड्डी, लांब उडी,उंच उडी, गोळा फेक धावणे या प्रकारच्या मैदानी खेळामध्ये पहिली ते आठवीच्या वडाचापाट,मसुरे,हडी व बांदिवडे मधील पहिली ते आठवीचे 250 विद्यार्थी,मुख्याध्यापक ,शिक्षक,
पालक व प्रशिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी मा. श्री संजय माने व केंद्रप्रमुख नारायण देशमुख,श्री नंदकिशोर गोसावी, श्री प्रसाद चिंदरकर हे उपस्थित होते.या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन वडाचापाट गावच्या सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री सचिन पाताडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने यांनी क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. व प्रशालेच्या उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळाचे महत्व विषद केले .तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख गोसावी यांनी केले.या क्रीडा स्पर्धेत संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर व ऑन.जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर यांनी शुभेच्छा दिल्या.क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रशालेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक सौ वेदिका दळवी,कुमारी प्रतिभा केळुसकर व महेश गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.