वन नेशन वन इलेक्शन चे विधेयक आज लोकसभेत सादर

स्थानिक पक्षांना निवडणुकांमुळे फटका बसण्याची शक्यता

काय आहेत फायदे ,तोटे जाणून घ्या

ब्युरो न्यूज: एक देश एक निवडणूक विधेयक आता 129 घटनादुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे.केंद्र सरकारतर्फे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे.भाजपने लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना थ्री लाईन व्हीप बजावला आहे.आज दुपारी १२ वाजता लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयक येणार असून केंद्रीय न्याय व कायदा संसदीय कार्य मंत्री अर्जुनराम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत.

One Nation one Election चे फायदे काय आहेत

1. मतदारांसाठी हे इलेक्शन सोयीस्कर असणार आहे.यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार

2. आर्थिक विकास वाढणार तसेच सतत धोरण बदलाची भीती राहणार नाही.

3. पुरवठा शाखेवरचा तान कमी होईल.

4. प्रशासनाला वारंवार मतदानाच्या कामात अडकून राहावं लागणार नाही.

5. एकच वेळी निवडणुका झाल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल.

6. सरकारी तिजोरी वरील भार कमी होईल

.One Nation one Election चे तोटे काय आहेत?

1. यामुळे स्थानिक समस्या सुटणार नाहीत.

2. स्थानिक संस्थांना, पक्षांना एकत्र निवडणुकांमुळे फटका बसण्याची शक्यता .

3. यामुळे राज्य सरकारचं महत्व कमी होऊ शकत.

4. EVM आणि VV PAT यांचा अधिक पुरवठा लागेल.

5. एकच वेळी निवडणुका घेतल्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा दलांची मोठी गरज लागेल.

6. एका राज्यातील सरकार कोसळल किंवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर नक्की काय याबाबत प्रश्नचिन्ह उभ राहत.

error: Content is protected !!