मुंबई प्रतिनिधी: पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार ट्रेन क्रमांक 90648 नालासोपारा (सायंकाळी ४.०८ वाजता) येथून सुटण्याऐवजी ती भाईंदर स्टेशनवरून सायंकाळी ४.२४ वाजता रवाना होईल. ट्रेन क्रमांक 90208 भाईंदर-चर्चगेट (सकाळी 8 वाजता) आणि 90249 चर्चगेट-नालासोपारा (सकाळी 9:30 वाजता) या लोकलला आता 12 डब्यांच्या ऐवजी 15 डबे असतील. या लोकल आता चर्चगेट ते मुंबई सेंट्रलपर्यंत जलद असतील.
भाईंदर रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून या निर्णयाचा निषेध
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच आणखी एक एसी लोकलसेवा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 12 सामान्य लोकलसेवा काढून टाकाव्या लागल्या. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा प्रवाशांनी विरोध केला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून या निर्णयाचा निषेध करण्यात आला असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत. संतप्त प्रवाशांना शांत करण्यासाठी रेल्वेने हे बदल केल्याचे बोलले जात असून यामध्ये भाईंदर रेल्वे स्थानाकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.