कुडाळ : केसरकांना त्यांच्या कारकर्दीत प्रथम पालकमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. परंतु केसकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सकाळी उठले की, केसरकर प्रवक्ते म्हणुन पोपटासारखे उद्धव ठाकरेंवर बोलायचे आज फडणवीस – शिंदेनी त्यांचाच पोपट केला जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली.
जिल्ह्यातील तरुणांचा रोजगार हिरावून घेत परजिल्ह्यातील लोकांना नोकरीला लावले, ज्यांनी स्थानिकांना त्रास दिला त्यांनाच मंत्री पदापासून दूर व्हावे लागले.आमदार ही झाले नसते EVM मुळे आमदार झाले मात्र मंत्री पदापासून वंचित राहवे लागले. केसरकरांनी स्थानिकांना रोजगार मिळेल म्हणुन मध्यंतरी सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. युवासेनेच्या आंदोलनंतर हा निर्णय बदलण्यात आला युवासेनेच्या आंदोलनामुळे आता निदान कंत्राटी पद्धतीने तरी जिल्हातील स्थानिकांना नियुक्त्या मिळणार आहेत. केसकरांनी जिल्ह्यातील स्थानिकांवर खूप अन्याय केला त्याची फळ केसरकर भोगत आहेत.
यापुढे केसरकर केव्हाच मंत्री होणार नाहीत ही साईंचीच इच्छा आहे, त्यांनी आता साईबाबांची सेवा करावी. असे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी म्हटले आहे.