आ. नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्यासह शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल यांना देखील फोन आल्याची माहिती मिळत आहे.
आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी आ. नितेश राणे यांना भाजपकडून फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांना कोणते मंत्रीपद दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.