गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई आयोजित भव्यदिव्य सांस्कृतिक स्नेहमेळावा संपन्न

गोळवण गावच्या विकासासाठी मुंबईकरांनी दाखवली एकजूट

गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई आयोजित भव्यदिव्य सांस्कृतिक स्नेहमेळावा अर्थात गोळवण स्नेहमेळावा रविवार दि.८ डिसेंबर.२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.
गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई चे सन्माननीय उपक्रमशील अध्यक्ष श्री. जगन्नाथ गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शशिकांत माळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोळवण स्नेहमेळावा संपन्न झाला.अगदी जल्लोषामय, मंगलमय , प्रसन्न वातावरणात गोळवणच्या लोकांच्या उल्लेखनीय उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई हे मंडळ म्हणजे ऐक्याचा महामेरू आहे. गोळवणच्या माणसांना एकत्रित आणण्यासाठी प्रचंड तळमळ, आत्मियता, आपुलकी, ध्यास हाच श्वास बनवून गोळवणच्या बारा वाडीतील प्रत्येकांना सोबत घेऊन गावाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत करून ऐक्यवर्धक नवचेतना देऊन मंडळ स्थापन करण्याचा विचार उराशी घेऊन स्नेहभाव, समाजशील, ध्येयवादी आणि जीद्दी व प्रचंड आत्मविश्वास आणि हिंमतवान असे जगन्नाथ गावडे हे व्यक्तीमत्व होय.जगन्नाथ गावडे यांच्या मनामध्ये गावच्या शहरी लोकांना एकत्र आणण्याचे बीज निर्माण झाले. कीत्येक दिवस मनातील त्या विचाराने ते तहानभूक विसरून गेले होते.ध्यानीमनी तोच विचार असायचा.गोळवणच्या उन्नतीसाठी , प्रगतीसाठी भारावलेले व्यक्तीमत्व म्हणजे जगन्नाथ गावडे साहेब होय.कोवीड-१९ च्या भयानक काळातील मृत्यूचे तांडव,भयानक परिस्थिती पाहुन गोळवण मंडळ स्थापन करण्याच्या उद्देशाने शशिकांत माळकर साहेब व जगन्नाथ गावडे यांचे याबाबत माझ्यासोबत बोलणं व्हायचं. गोळवण गावातील बहुतांश तरुण वर्ग मुंबई ६५० ते ७०० किलोमीटर अंतरावर पुण्यासारख्या शहरी भागात नोकरीनिमित्त , कामधंदा यानिमित्ताने राहतात. गावी काही अघटीत घडले तर आपल्या गावात वैद्यकीय साधने, सुविधा नाहीत. गावी असलेल्या बुजुर्गाच्या मृत्यूनंतर शहरी भागातील मुलाबाळांना गावी अंत्यदर्शनासाठी यायला बराच वेळ लागतो.शव शितपेटीगृह गावात असायला हवे. आपणच पुढाकार घेतला पाहीजे.आपल्या गावांसाठी आपण एकत्र यायला हवे. आज नाही तर कधीच नाही. काय करायचे ते आताच करायला हवे अशी जीद्दी खूणगाठ मनाशी बांधली.शशिकांत माळकर यांचा रोखठोक बेधडक स्वभाव.प्रत्येक गोष्ट कशी सत्यात उतरवायची हे शशिकांत माळकर साहेब यांच्या नीडर, बेधडक स्वभावाने दाखवून दिली.मंडळ स्थापन करण्याची जीद्द उराशी घेतलेले दोन तरुण अनेकांच्या भेटीगाठी घेत होते.लोकांना एकत्रित करणे ही साधी गोष्ट नसते. आर्थिक पाठबळ कसे उभे करायचे हा प्रश्न असायचा. शशिकांत माळकर यांचा दांडगा अनुभव कामी आला. स्वतः बॅंकिंगपेशात मध्ये असल्याने आर्थिक ताळेबंद कसा साधायचा यांचे अचूक मार्गदर्शन माळकर साहेब करायचे. पहिल्यांदा एकत्र आलेले १४ लोक होतो.जगन्नाथ गावडे यांच्या विचारधारेने सारा माहोल ऐक्यमय झाला. शिवरायांच्या स्वराज्याच्या शपथे प्रमाणे गोळवणवासिय जगन्नाथ यांच्या सोबत अभेद्य भींतीसारखे उभे राहिले.गोळवणंचं ऐक्य एकवटले. जगन्नाथ शिवबाप्रमाणे मावळ्यांना एक- एक जोडत गेले.स्वतःचा पैसा खर्च करुन लोक समुदाय एकत्र आणावा लागला.जगन्नाथ गावडे सुमधुर आवाजाचे महान भजनी बुवा आहेत. तसेच राजकीय क्षेत्रातही त्यांचा विशेष सहभाग असतो.पण गावचे ऐक्याला ते विशेष प्राधान्य देतात. लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत गेला.चंद्रकांत लाड साहेब, गुरुनाथ मांजरेकर साहेब,अशोक परब साहेब, विलास परब साहेब, प्रशांत परब साहेब,राम गावडे साहेब,प्रभाकर आंगचेकर साहेब,राम गावडे साहेब, सहदेव चव्हाण साहेब,भरत गावडे साहेब, प्रमोद राणे साहेब, अविनाश परब, दिनेश सावंत साहेब,खरात साहेब, मंगेश चव्हाण साहेब विद्याधर गावडे साहेब, सिताराम खरात, कुंभार साहेब,पांडुरंग चव्हाण साहेब,संदेश रविकांत गावडे, साईनाथ चिंदरकर, लक्ष्मण खरात साहेब, मुकुंद पवार साहेब
प्रत्येकजण म्हणजे गोळवणचं रत्न आहेत. प्रशांत परब यांचा शांत,सोज्वळ,प्रांजळ स्वभाव! पण हिशोबाचा लेखाजोखा मांडताना तरबेजपणा वाखाणण्याजोगा आहे. गावच्या उत्कर्षासाठी अनेक उपक्रमशील कल्पना प्रशांत मांडत असतो.मंडळासाठी तो भरपूर वेळ देतो. विद्याधर गावडे साहेब यांच्याबद्दल काय बोलावे? मंडळाच्या कार्यकारिणीवरील आधारस्तंभ ! मंडळाच्या आवकजावक , जमाखर्च, नवीन सदस्य या प्रत्येक नोंदी अगदी क्षणार्धात उपलब्ध करून देण्यात तरबेज आहेत.संगणकीय कामकाज निःशुल्क करून देतात.मंडळासाठी प्रत्येक दिवसातील काही काळ नेहमीच देऊन मंडळाचा तांत्रिक आणि आर्थिक लेखाजोखा पद्धतशीरपणे मांडून ठेवणारा सच्चा माणूस,! अगदी कालच्या मेळाव्याला सगळ्यात पहिली ₹ ५०००/- ची वर्गणी जाहीर करुन देणगीदारांसाठी मुहूर्तमेढ रोवली.अतिशय शांत स्वभाव, सगळ्यांना समजून घेऊन गावच्या उत्कर्षासाठी लढणारा खरा लढवय्या.आम्ही विद्याधर गावडे साहेबांना ‘अण्णा’ याच नावाने हाक मारतो.सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, महिलांसाठीच्या कार्यक्रमासाठीची बक्षिसे या गोष्टी होलसेल मार्केटवरुन आणण्यासाठीचं विशेष कौशल्य आत्मसात केलेला ‘अण्णा’ कुठल्याच बाबतीत कमी नाही.अण्णाला मानसन्मानाचा हेवा कधीच नाही.त्यामुळे अण्णा कधीच कुणावर कधी रागावताना मी पाहिलेले नाही! असा अगदी गोड स्वभावाचा माणूस!
अशोक परब साहेब म्हणजे कायदेविषयक बाबींची परिपूर्ण माहिती घेऊन मुद्देसूद विषय मांडणारा आम्हाला मोठ्याभावासमान असे मंडळाचे कुशल, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष आणि कुशल मार्गदर्शक.चौकस ज्ञानांचा व्यासंग,प्रत्येक गोष्टीचा गाढा अभ्यास असलेलं हे अष्टपैलू असे गोळवण रत्न!
विलास परब साहेब म्हणजे सळसळता उत्साह! कोणतेही काम जीद्दीने, नीटनेटकेपणे करणारे शिस्तप्रिय व्यक्तीमत्व! गावच्या ऐक्यासाठी वेळ काढुन प्रचंड तळमळ,आत्मियता, आपुलकी,स्नेहभाव जपत मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी १००% प्रचंड मेहनतीने काम करणारा मंडळाचा आधारस्तंभ म्हणजे विलास परब साहेब होय. विलास परब साहेब आपल्यावर सोपविलेले जबाबदारी तन्मयतेने पार पाडतात.शिस्तबद्ध आणि निट नेटकेपणा याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.
गुरुनाथ मांजरेकर साहेब म्हणजे कर्णाचा अवतारच! दानशूर व्यक्ती! रवळनाथ मंदिर गोळवण येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सतत सात दिवस सर्व भक्तगणांना स्वखर्चाने दररोज महाप्रसाद देणारा ‘देवमाणूस’…!! संकटकाळात मदतीसाठी धावून येणारा दिलदार कलाप्रेमी माणूस…. म्हणजे गुरुनाथ मांजरेकर साहेब होय. मित्रपरिवारासाठी कमालीचं आदरातिथ्य. आपल्या गावच्या माणसांसाठी जिव्हाळा, आपुलकीने विचारपूस करणारा मुंबई सारख्या शहरात गावातील लोकांना आपलेपणाने आदरातिथ्य करणारा. मंडळ स्थापना दिनानिमित्त गोळवण गावांमध्ये दशावतारी नाटकाचा संपूर्ण खर्च उचलणारा सच्चा दानशूर,!!तसेच बायपास सर्जरी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच विश्रांती न घेता गावाच्या मंडळाच्या कार्यक्रमात उपस्थित राहुन गावच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी झटणारा जणू कर्णाचा अवतारच.आता नुकताच झालेला मेळावा संपन्न करण्यात लाखमोलाचे सहकार्य करणारा रोख रक्कम ₹१०,००० रुपये मेळाव्यासाठी मुलगी अमृताच्या नावाने देणगी देऊन तरुणाईला जणू आवाहनच केले आहे.गुरुनाथ मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांची खैरात करताना मागेपुढे पाहत नाहीत.
भरत गावडे गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबईच्या मंडळाच्या उत्कर्षासाठी लढणारा खरा हिरा आहेत. कोणतीही सभा आयोजित करण्यासाठी बिनदिक्कतपणे आपले घर देणारा निस्वार्थी माणूस.ख्यातनाम भजनी बुवा म्हणून गोळवण गावात त्यांचे नावलौकिक आहे.भरत गावडे यांची उपक्रमाबाबत असलेली कल्पकता वाखाणण्याजोगी असते.माणसांना प्रत्यक्ष भेटून आपल्या मंडळाची सर्व ध्येये आणि उद्दीष्टे प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी झटणारा सच्चा दिलदार माणूस .प्रत्येक सभेला उपस्थित राहुन मंडळाची विचारधारा मजबूत करणारे.मंडळाचे आधारस्तंभ आहेत.
पांडुरंग चव्हाण साहेब…. चव्हाणवाडी. पांडुरंग चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शन हे आमचे भाग्य आहे.आपल्या वाडीतील सदस्यांना मंडळाची विचारधारा पटवून देऊन मंडळाला मार्गदर्शन करत असतात.आजपर्यंतच्या प्रत्येक मिटिंगमध्ये आवर्जून उपस्थित राहणारे.
मुकुंद पवार साहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे मुकुंद पवार साहेब कुठल्याही बाबतीत कोणतेही काम जीद्दीने नीटनेटकेपणे करणारे शिस्तप्रिय व्यक्तीमत्व.प्रशासकीय कामकाज कायदेशीर सर्वव्यापक माहीतीचा व्यासंग असलेला मुकुंद पवार शांत सुस्वभावाचा मित्र.मंडळाच्या प्रारंभापासून प्रत्येक गोष्टीत हिरहिरीने भाग घेणारा अभ्यासू माणूस.सुखदुखाच्या क्षणात आवर्जून आत्मियतेने सहकार्य करण्यासाठी झटणारा व्यक्ती.गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई च्या अनेक निर्णयांमध्ये विशेष मार्गदर्शन करुन तडिस नेणारा लढवय्या सदस्य.
संदेश गावडे साहेब म्हणजे मंडळाची विचारधारा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत सहकार्य असताना प्रचंड तळमळ, आत्मियता, आपुलकी स्नेहभाव जपत मेहनत करुनही कधीच प्रकाशझोतात न येणारी व्यक्ती.
चंद्रकांत लाड साहेब यांची गावाच्या विकासासाठी,उत्कर्षासाठीची धडपड नेहमीच लक्षात घेण्यासारखी आहे.अनेक संघटनांचे विशेष पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना लाड साहेब गोळवणच्या मंडळाला आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करत आहेत. व्यस्त कामकाजातूनही त्यांनी वेळात वेळ काढून गोळवण स्नेहमेळाव्याला ते गावाहुन सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहिले.
सिताराम खरात साहेब गोळवणच्या मंडळाला नेहमीच सहकार्य करत आहेत.कार्यक्रमाच्या प्रारंभा आधी एक तास उपस्थित राहुन क्रिडास्पर्धा असोत नाहीतर स्टेजवरील प्रमुख पाहुणे यांचा सत्कार सोहळा असो कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी अगदी कार्यक्रमाची सांगता पर्यंत होईपर्यंत मागे हटणार नाहीत.हे आपल्या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी झटणारे प्रगतीचे हात आहेत.
गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मंडळ मुंबई आयोजित भव्यदिव्य गोळवण स्नेहमेळावा म्हणजे दिमाखदार सोहळाच होता. जवळपास ५५० लोक सोहळ्यात उपस्थित होते. गावाहुन प्रमुख पाहुणे म्हणून गोळवण गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच श्री. सुभाष लाड साहेब उपसरपंच श्री. शरद मांजरेकर साहेब,माजी उपसरपंच श्री.दादा गावडे सर, गोळवण ग्रामपंचायत सदस्या सौ. मेघा मुरारी गावडे, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी श्री. आप्पा घाडी, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक रमेश परब साहेब
तसेच बोरकर वाडी येथील श्री. रमेश परब,श्री. संतोष चव्हाण साहेब, श्री. सुहास घाडीगांवकर, श्री. विठ्ठल तळवडेकर‌‌ बुवा,श्री. तेजम महाराज,श्री. विलास नाईक इ. प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अरुण घाडी यांच्या खणखणीत गा-हाणारुपी प्रार्थनेने झाली तदनंतर सुरेल चक्रीभजनाने वातावरण मंगलमय झाले. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. जगन्नाथ गावडे साहेब यांनी सर्वप्रथम चक्रीभजन गायनाने मंगलमय सुरुवात केली, त्यानंतर जेष्ठ भजनी बुवा श्री. विठ्ठल तळवडेकर‌‌ बुवा यांनी ‘ ‘मानसन्माची देवा नसे मला हाव’ अभंग गायला त्याना पखवाज साथ गोळवणचे सुपुत्र जेष्ठ पखवाज वादक श्री. श्यामसुंदर सावंत यांनी दिली. त्यानंतर अरुण घाडी,भरत गावडे या बुवांनी चक्रीभजनात सुरेल मैफल सादर केली.
त्यानंतर पखवाज वादन कार्यक्रम संपन्न झाला. अनेक पखवाज वादकांनी आपली कला सादर केली. आठ पखवाज वादकांनी आपली कला सादर केली. गोळवणचे पहिले संगीत विशारद श्री. नितेश गावडे यांनी पखवाज वादन कार्यक्रमाचे परिक्षण केले. त्यानंतर सोलो गायन झाले यामध्ये एकूण १२ सदस्यांनी गायन सादर केले. त्यानंतर लहान मुलांचे आजार रेकॉर्ड डान्स सादरीकरण झाले तब्बल २१ स्पर्धकांना नृत्य सादर करण्याची संधी देण्यात आली. गोळवणचा बालगंधर्व दशावतारी कलावंत गुरुनाथ सावंत यांने ‘सकला’ हे मालवणी स्त्री पात्र तर गुरुनाथ अर्थात (सर्वेश) गावडे यांने दारोडा सादर करुन कार्यक्रमाची धुराच आपल्या हाती घेतली प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. बक्षिसांची लयलूट करत शाबासकी मिळवली.
त्यानंतर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा सादरीकरण झाले.या स्पर्धेत सोळा महिलांना स्पर्धेत खेळण्याची संधी दिली. चार विजेत्या स्पर्धकांना पैठणी साड्या बक्षीसे देण्यात आली. दहावी बारावी उत्तीर्ण २५ विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. तसेच उपस्थित असलेल्या सर्वच लहान मुलांना शालेय कीट भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. शेवटी लकी ड्रॉ स्पर्धेचा निकाल जाहीर करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या भव्य दिव्य सोहळ्यात तब्बल साडेपाचशेपेक्षा जास्त गोळवण प्रेमी उपस्थित होते. कोण ओला बुक करुन आले होते तर कोण गाड्या घेऊन आले होते पालघर, विरार,कर्जत,वांगणी,लालबाग,पुणे, कोल्हापूर येथून लोक स्वखर्चाने मेळाव्याला उपस्थित होते. विशेषतः माहेरवाशीण स्त्रियांची उपस्थिती उल्लेखनीय होते.२३५ महिला वर्ग उपस्थित होत्या.
स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन गावकरी परतीच्या प्रवासाला निघाले.भव्यदिव्य मेळावा म्हणजे गोळवणच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा होता.

error: Content is protected !!