मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे यानिमित्त कार्यक्रम सकाळी 6 वाजता श्रींचे स्नान ,सकाळी 8 वाजता श्रींचा चरण पादुका अभिषेक, सकाळी 10 वाजता श्री सत्यदत्त पूजा, सकाळी 11 वाजता श्रीदत्त होमहवन ,दुपारी 12 वाजता ब्रह्मांडनायक दिनदर्शिका 2025 से प्रकाशन , दुपारी 12.30. आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी 4 ते 6.30 स्थानिकांचे सुस्वर भजने , सायंकाळी 7 वाजता सामूहिक नामस्मरण ,राञौ 7:30 वाजता पालखी प्रदक्षिणा ,राञौ 8.30 वाजता आरती ,राञौ 9 वाजता महाप्रसाद ,राञौ 10 वाजता बुवा श्री सचिन मिस्त्री माऊली प्रासादिक भजन मंडळ बीडयेवाडी कणकवली यांचे भजन असे कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भक्त मंडळींनी उपस्थित राहून स्वामी समर्थ दर्शनाचा व पालखी पादुका दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.