कुडाळमधून अपक्ष उमेदवारी अर्ज….
कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ स्नेहा वैभव नाईक यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कुडाळ मधून दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळच्या नगरसेविका श्रेया गवंडे आणि श्रुती वर्दम उपस्थित होत्या.विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी यापूर्वीच गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी एकूण दोन अर्ज दाखल केले आहेत. तरीसुद्धा आज वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.