श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव प्रशालेच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सोहळा व शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचलित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव या प्रशालेमध्ये इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष रो श्री मकरंद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी व्यासपीठावर तळगाव हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष आनंद दळवी, सुनील दळवी, अनिल दळवी, स्थानिक समितीचे अध्यक्ष उत्तम दळवी तसेच तळगाव हितवर्धक मंडळाचे विविध सदस्य, स्थानिक कमिटीचे सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खोचरे, त्यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन, ईशस्तवन आणि स्वागत गीत झाले. त्यानंतर प्रमुख पाहुणे रो. मकरंद नाईक तसेच संस्थेचे अध्यक्ष आनंद दळवी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर प्रशालेमध्ये 31 वर्षाची सेवा करून आज सेवानिवृत्त होत असलेले प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संस्थेचे पदाधिकारी व रो मकरंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमात बोलताना रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी ग्रामीण भागामध्ये संस्था चालविण्यासाठी शाळा चालविण्यासाठी संस्थाचालक व शिक्षक घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमास सेवानिवृत्त झालेले बरेचसे शिक्षक, माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांचेही त्यांनी कौतुक केले. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भविष्यामध्ये चांगले नागरिक होण्यासाठी काय करावे याचे अनमोल असं मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!