आम्हाला हवी असणारी पद मिळतील

आ.उदय सामंत यांचं वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी: आम्हाला हवी असणारी योग्य ती मंत्रीपद मिळतील, त्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केलं. दरम्यान, कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत, फक्त आमच्या विरोधकांनी तयार केलेल्या बातम्या असल्याचे उदय सामंत म्हणाले. ज्यांनी मागच्या पाच दिवसांमध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की भाजप जो कोणी चेहरा देईल त्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल. त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशा बातम्या नुसत्या पसरवल्या जात असल्याचे उदय सामंत म्हणाले.

मंत्रीपदाबाबत निर्णय हे एकनाथ शिंदेच घेतात.

आमच्या पक्षाला कुठले मंत्रीपद हवे आहे, त्या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदेच ठरवतील असं सामंत यांनी सांगितलं. मी जरी पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित असतो तरी मंत्रीपदाबाबत निर्णय हे एकनाथ शिंदेच घेतात. कुणाला कोणते मंत्रिपद हवे त्या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत आणखी निर्णय होऊन समोर येईल असं सामंत यांनी सांगितलं. राणे आणि सामंत या घरातील दोन सख्खे भाऊ सभागृहात जात आहेत. यावर बोलताना सामंत म्हणाले की, सेवा करण्यासाठी जातोय, याबाबत आम्ही नक्कीच समाधानी आहोत.

error: Content is protected !!