टेम्पोच्या धडकेत झरेबांबर तिठा येथे सात वर्षाची चिमुकली ठार

दोडामार्ग : भाजी वाहतूक करणा-या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.ती रस्ता ओलांडत असताना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झरेबांबर तिठा ही घटना घडली. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे तिचे नाव आहे. तिला अधिक उपचारासाठी तिथून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुरतीचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे संबंधित टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी जमावाकडून करून करण्यात आली आहे.

दोडामार्ग – बेळगाव मार्गावर झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने सुसाट वेगात शाळकरी मुलीला चिरडले. या अपघातात सदर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या अंगावरुन टेम्पो (एमएच ०९ सीयू ७९४९) गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली. श्रिया संदीप गवस (वय ७ वर्षे, रा. मांगेली) असे तिचे नाव आहे. या घटने बद्दल स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

श्रेया ही काल झरेबांबर येथे आपल्या मामाकडे जत्रेसाठी आपल्या आईसह आली होती. आज ती घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

error: Content is protected !!