सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कणकवलीत ठाकरे शिवसेनेतर्फे जनसही मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल – सुशांत नाईक

कणकवली : नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तसेच पर्यावरण रक्षण, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी पद्मश्री सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कणकवली कॉलेज येथे ‘जनसही मोहीम’ राबवण्यात आली. या अभियानाला नागरिकांसह तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले,जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केले त्याला सरकार आणि पोलिसांनी दडपशाही करून जबरदस्तीने वांगचुक यांना उचलून नेण्यात आले. यातून भारत देश हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे हे दिसुन येते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना,युवासेना तर्फे आम्ही सह्यांची मोहीम राबीविली विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी या आंदोलनाला समर्थन दिले पाहिजे.सरकार विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला तयार नाही. शिक्षण मंत्री राजीनामा द्यायला तयार नाहीत. जनतेचा आवाज दाबण्यासाठी मात्र सरकार आपली सर्व ताकद लावत आहे .शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे अशी देशातील विद्यार्थ्यांची मागणी असून त्याला आमचे समर्थन आहे असे त्यांनी सांगितले.


“तुमची एक सही – लोकशाहीच्या बाजूने एक ठाम पाऊल!” हे ब्रीदवाक्य घेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकशाही बळकट करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सोनम वांगचुक यांच्या चळवळीला पाठिंबा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत सर्व स्तरांतील लोकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, शिवसेना तालुका संघटक राजू राठोड, प्रतीक रासम, रोहित गावडे, रवी विचारे, समर्थ म्हसकर, तन्मय सामंत, महेंद्र नाईक, निखिल जाधव, राज विचारे, आदित्‍य जोशी, लवेश पांचाळ, अनिरुद्ध जगताप, सर्वेश जाधव, साहिल जाधव, सिद्धेश गावडे, हुसेन लदाफ यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!