सावंतवाडी : बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट), सावंतवाडी येथे शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत बाल चित्रकला स्पर्धा संदर्भातील माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. परिषद सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कला शिक्षक एकत्र येणार आहेत.
कार्यशाळेदरम्यान कला संचालनालयाचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे, कलाशिक्षण मंडळाचे संचालक श्री. विनोद दांडगे तसेच कलाशिक्षण मंडळाच्या सचिव श्रीमती स्मिता किंकळे हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
बी एस बांदेकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले तसेच सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बी. जी. सामंत व जिल्हा उपसमन्वयक श्री. रुपेश नेवगी यांनी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी या माहितीपूर्ण कार्यशाळेस उपस्थित राहून बाल चित्रकला स्पर्धेच्या आयोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.