घरावर झाड कोसळून झाले होते घरातील साहित्याचे नुकसान
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथील निराधार वृद्ध महिलेला रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या माध्यमातून गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील मांडकुली नाईकवाडी येथील श्रीमती जानकी सावंत या महिलेच्या घरावर झाड पडल्यामुळे घराचे छप्पर कोसळले होते. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरून घरातील जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे सदर महिलेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत गावातील ग्रामस्थ विनोद नाईक यांनी आपले मित्र रो. प्रमोद भोगटे यांच्या कानावर घातली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून सदर निराधार महिलेला गृहपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी रो. मकरंद नाईक, रो. राकेश म्हाडदळकर, रो. प्रमोद भोगटे, रो. निता गोवेकर, रो. डॉ. जयश्री केसरे, रो. आनंद वेंगुर्लेकर तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सदर महिलेने रोटरी क्लब ऑफ कुडाळचे आभार मानले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.