सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल, केळुस हायकुल आणि माड्याची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सानिका केअरटेकरच्या संचालिका तथा सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे करण्यात आले.

यावेळी सानिका तुळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या शाळेत आपले शिक्षण झाले त्या शाळेच्या मंचावर आपल्याला विचार मांडण्याची संधी मिळाली याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, आजवर आपण अनेक निराधार आणि वंचित लोकांसाठी काम केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता यावं अशी मनोमन इच्छा होती. कारण, आपला जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे विद्यार्थिदशेत असताना अनेक गोष्टींपासून वंचित रहावे लागले. ही परिस्थिती इतर विद्यार्थ्यांवर उद्भवू नये म्हणून आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी फार मोठा आर्थिक खर्च येणार होता. त्यामुळे पैशांअभावी हे अशक्य असल्याचे त्यांना वाटले. परंतु आपण चांगले वक्तृत्व करू शकतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले. तेव्हा अनेक चांगले लोक त्यांच्या संपर्कात आले. या लोकांना त्यांचे म्हणणे पटल्यामुळे या उपक्रमामध्ये सर्वांनी त्यांची साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात मुलांना कशाचीही गरज पडल्यास ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली. अपयश ही यशाची पहिली पायरी असून भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत रहा असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सिताराम संजीवनी आश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!