विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करा, मन लावून अभ्यास करा आणि मोठे व्हा
कणकवली : आज तुम्हाला मिळालेली ही वही आणि पेन म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारे साधन आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” म्हणून, आज मिळालेल्या या साहित्याचा योग्य वापर करा, मन लावून अभ्यास करा आणि मोठे व्हा. आज समाज तुमच्या पाठीशी उभा आहे, उद्या तुम्ही मोठे होऊन या समाजाचे ऋण फेडण्यासाठी सज्ज व्हा, हीच तुमच्याकडून आमची एकमेव अपेक्षा आहे.असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी विद्यार्थ्यांना केले
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल शाळा नंबर १ येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळीही तालुका कार्यकारीणी निमंत्रीत सदस्य शशिकांत राणे,
हळवल सरपंच सरपंच हळवल अपर्णा चव्हाण,उपसरपंच प्रभाकर राणे ,माजी सरपंच संतोष गुरव, समर्थ राणे ग्रा,प, सदस्य सचिन ठाकूर,गौरी परब,पूर्वा राणे,जेष्ठ कार्यकर्ते,वामन परब,लवू परब, शिवा राणे,सागर राणे,प्रथमेश राणे शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते
राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गाव हळवल भाजपा च्या वतीने आणि भाजपा तालुका कार्यकारीणी निमंत्रीत सदस्य शशिकांत राणे यांच्या संकल्पनेतून हळवल शाळा नंबर १,२आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू(वह्या पेन)आणि खाऊ वाटप करून वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


Subscribe










