पालकमंत्री मा.श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २५०० रक्तचंदन रोपांचे शालेय विद्यार्थ्यांना होणार वाटप.

माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांचा “एक पेड़ माँ के नाम” हा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम.

कणकवली/ प्रतिनिधी :

पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे.जगभरात हवामान बदलाचे वाढते परिणाम,एल निनो (El Niño) सारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे दुष्काळ,अवेळी पाऊस आणि तापमानवाढ यांचा विचार करून पर्यावरण संवर्धनासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून भरतीत जनता पार्टी तर्फे कणकवली तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना तब्बल २५०० रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमाला “एक पेड़ माँ के नाम” असे अर्थपूर्ण आणि भावनिक नाव देण्यात आले आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे,त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.रक्तचंदन हे आर्थिक,औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष मानले जाते.या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास भविष्यात हरित पर्यावरण निर्मितीस मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीवही निर्माण होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून,पालकमंत्री श्री.नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.
“एक पेड़ माँ के नाम”या संकल्पनेद्वारे वृक्षसंवर्धनाबरोबरच मातृप्रेमाचा संदेश देत पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हरित सिंधुदुर्ग आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

error: Content is protected !!