गावागावात बसवलेले प्रीपेड मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात यावे

कुडाळ शिवसेनेचे (उबाठा) महावितरणला निवेदन

कुडाळ : महावितरणकडून बसवण्यात आलेले अदानीचे मीटर काढून टाकण्यात यावे तसेच जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावे. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

सध्या राजरोसपणे गावागावात अदानीचे प्रीपेड मीटर जोडले जात आहेत. महाराष्ट्र शासन आज महावितरणच्या माध्यमातून अदानीचे घर भरण्याचे काम करत आहे. हे त्वरित थांबवण्यात यावे तसेच आपल्या कार्यालयाकडून जे अदानीचे मीटर बसवण्यात आलेले आहेत ते त्वरित काढून टाकावे. त्या मीटरची बिले मोठ्या प्रमाणात येत असून सर्व जनतेला याचा नाहक त्रास भोगाव लागत आहे. त्यामुळे तात्काळ ते मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात यावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

यावेळी उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी,उपशहर प्रमुख शैलेश काळप, गुरू गडकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, विभाग प्रमुख दिपक आंगणे, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, प्रसाद गावडे, दिपक गावडे, रामचंद्र कोकरे, किरण कोचरेकर, संजय बोभाटे,आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!