शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्यशाळा

कुडाळ प्रतिनिधी

शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कुडाळ येथे कुडाळ व कणकवली मतदारसंघातील शिवसेना बी.एल.ए. (BLA) व एस.आय.आर. (SIR) पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण कार्यशाळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या कार्यशाळेमध्ये पक्षांनी प्राधिकृत केलेल्या बी. एल. ए. या कार्यकर्त्यांचे एस. आय. आर. मध्ये महत्त्वाचे काम काय आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारे काम करावे लागेल याचे मार्गदर्शन एस.आय.आर. शिवसेना राज्यप्रमुख अविनाश सनस यांनी केले तसेच संघटन बळकटीकरण, आगामी जबाबदाऱ्या आणि पक्षाच्या धोरणांविषयी मोलाचे विचार मांडले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, लोकसभा संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!