कुडाळ : कडावल उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर स्वरूप वाळके यांनी जोरदार कामांना सुरुवात केली आहे. पणदूर – घोडगे मार्गावरील कडावल बाजारपेठ येथील गटारांची साफसफाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करून घेण्यात आली.
पणदूर – घोडगे मार्गावरील कडावल बाजारपेठ येथे पक्की गटारे असून ती बंदिस्त नसल्यामुळे त्यामध्ये गाळ आणि कचरा साठला होता. त्यामुळे पावसाळ्यात गटारांच्या प्रवाहामध्ये अडथळा येऊन पाणी रस्त्यावर येण्याची दाट शक्यता होती. शिवाय गटारावर झाकण नसल्याने अपघात होत होते. कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. आज पावसाळ्यापूर्वी संबंधित गटाराचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. यावेळी कडावल सरपंच रश्मी मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.