सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या आदेशानंतर तत्काळ कामांना सुरुवात

कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

कुडाळ शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यांवरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी दिनांक २८ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्याबाबत आदेश दिले होते. नगराध्यक्षांच्या आदेशानंतर तात्काळ खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील उर्वरित रस्त्यांवर पडलेले खड्डे देखील लवकरात लवकर बुजवण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!