अवकाळी पावसाने रस्ता ओला झाल्याने दुचाकी घसरली

वेंगुर्ले – मठ येथील घटना

देवगड येथील युवकाचा मृत्यू

वेंगुर्ले : मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता. त्यामुळे गाडी घसरून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.

तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावर गुरुवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ता ओला असल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला. वेंगुर्ले येथून शुभम आपल्या दुचाकीने देवगड कडे जात होता. मात्र मठामध्ये रस्त्यावर दुचाकी घसरून समोर असलेल्या चारचाकी गाडीला धडकली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दुचाकी स्लिप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने अधिक उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात त्याला हलविले.

error: Content is protected !!