दुचाकीस्वाराचा मृत्यू
कणकवली : मित्राला सोडण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथून पुढे एकटाच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने भरधाव वेगाने जात असताना सुकर शिवनाथ प्रसाद (42, मुळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी बांधकरवाडी स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. यात गंभीर जखमी झालेल्या सुकर शिवनाथ प्रसाद याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची घटना मंगळवारी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास घडली होती. मयत सुकर प्रसाद हा जानवली येथील सागर कोकीतकर यांच्याकडे कामास होता व तेथेच राहत असे. मंगळवारी रात्री 11.30 वा. च्या सुमारास त्याच्या गावाकडील पंकज कुमार याला कणकवली रेल्वेस्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता तेथे काही वेळ थांबल्यानंतर तो पुढे एकटाच कनेडी-नरडवे रोडने मोटरसायकलने गेला असताना रात्री 1 वा. च्या सुमारास त्याचा बांधकरवाडी स्टॉपजवळ अपघात झाला.
त्याला स्थानिकांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर त्याचा भाऊ अर्जुन प्रसाद याने कणकवली पोलिसांत दिली.


Subscribe










