
महिला दशावतार मंडळाचे ‘स्मशान वैरागी’ नाटक ठरणार विशेष आकर्षण
योगिता कानडे/कुडाळ : पावशी येथील इस्वटी ब्राह्मण देवालय, बेलनदी वाडी येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी’ यांचा नवीन संचातील ‘स्मशान वैरागी’ हा पौराणिक भव्य ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
दिवसभराचे कार्यक्रम:
उत्सवाच्या निमित्ताने रविवारी दुपारपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल:
दुपारी ३.०० वा.: श्री सत्यनारायण महापूजा .
सायंकाळी ५.३० वा.: महाआरती.
सायंकाळी ७.३० वा.: महाप्रसाद (तीर्थप्रसाद).
रात्री ८.०० वा.: ‘कुलस्वामी प्रासादिक भजन मंडळ, पावशी बेलनदी’ यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम.
रात्री ९.०० वा.: ‘स्मशान वैरागी’ दशावतारी नाट्य प्रयोग.
या कार्यक्रमाचे आयोजन बेलनदी वाडीतील सर्व रहिवासी, श्री ब्राह्मणदेव गवळदेव मित्र मंडळ यांनी केले आहे. या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



Subscribe










