
कणकवलीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिर.!
तहसील प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार.!
कणकवली : कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत प्रशासन संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कणकवली तहसील कार्यालयात दिव्यांग पेन्शन धारकांसाठी हयात दाखला तसेच उत्पन्न दाखला मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे शंभर नागरिकांनी उपस्थिती लावली.
विशेष म्हणजे, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक दाखल्यांचे तात्काळ वितरणही करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान तहसीलदार दीक्षांत देशपांडे, संजय गांधी शाखेतील श्रीम. हेमलता तोरस्कर, श्रीम. आरती ढोणे तसेच एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिन सादये, यल्लप्पा कट्टीमणी, श्री. वारंगे, बाळकृष्ण बावकर, मोहन परब यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी व दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते. दरम्यान, दिव्यांग बांधवांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Subscribe










