गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर. व युवा प्रतिष्ठान करंगुटकरवाडी अध्यक्ष केतन शिरोडकर यांनी दिली शिबिरास सदिच्छा भेट.
आयुष्यमान आरोग्य मंदिर पणदूर अंतर्गत उपकेंद्र पिंगुळी. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत आरोग्य शिबिर मदरसा फलाह -ए – उम्मत गोंधळपूर पिंगुळी येथे 14 वर्षा वरील मुले व नागरिक यांना आरोग्य मार्गदर्शन व आरोग्य तपासणी एक्सऱे तपासणी,टेली मेडिसिन, रक्त तपासणी, मदरसा मधील मुलांची हिमोग्लोबिन व रक्त गट तपासणी व नागरिक यांना आरोग्य मार्गदर्शन व बी. पी. मधुमेह तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद भेटला.तसेंच आयुष्यान आरोग्य मंदिर पणदूर आरोग्य निरीक्षक यशवंत आरोसकर यांची टीम कार्यरत होती तसेंच डॉ समुदाय आरोग्य अधिकारी पिंगुळी सोनाली गोरे मॅडम, आरोग्य सेवक टेमकर सर,J.B. बाबर्डेकर आरोग्य सेवक, लॅब टेक्निशियन. जिया मानकदार, सुषमा वाळके, समीक्षा पडेलकर. आशासेविका मेघना खोत, समृद्धी शेटकर, स्वेता गावडे, मनीषा मुंडये सर्व टीम उपस्थिती होती.
गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर. व युवा प्रतिष्ठान करंगुटकरवाडी पिंगुळी केतन शिरोडकर यांनी दिली सदिच्छा भेट.
यावेळी मदरसा फलाह -ए – उम्मत गोंधळपूर पिंगुळी अध्यक्ष मुस्ताक शेख व शिक्षक बरकत सर तसेच प्रशालेतील मुले व नागरिक उपस्थित होते.या शिबिरास उस्फुर्त प्रतिसादात बद्दल मदरसा फलाह -ए – उम्मत गोंधळपूर पिंगुळी चे शिक्षक यांनी सर्वाचे आभार मानले.


Subscribe










