मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन रेडकर यांचे दुःखद निधन

आचरा ठाकरे शिवसेनेकडून श्रद्धांजली अर्पण

वायंगणी गावचे सुपुत्र व मुंबई महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक नितीन रामचंद्र रेडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे 12 /04/2026 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुंबई शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन रेडकर हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या अचानक निधनामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ते आचरा ठाकरे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सचिन रेडकर यांचे मोठे बंधू होते तर वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर यांचे दिर होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे.रेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे ठाकरे शिवसेना आचरा विभागाकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

error: Content is protected !!