कुडाळ प्रतिनिधी: सकल मराठा समाज कट्टा .दशक्रोशी तर्फे वराड गावातील आर्थिक दृष्ट्या गरीब परंतु अतिशय हुशार विध्यार्थिनी कु .सिध्दी राउत ही कुडाळ येथे बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे परंतु तिच्याकडे अभ्यासा साठी अॕन्ड्राईन मोबाईल नव्हता .तीने सकल मराठा समाज कडे मागणी केली समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यानि विचार करुन तीला मोबाईल देण्याचे ठरले त्या प्रमाणे आज रविवार दि १/१२/२०२४ रोजी तीला हा मोबाईल सकल मराठा समाज कट्टा तर्फे देण्यात आला त्यावेळी तीचे वडील साबाजी राउत आणि डाॕ जी आर सावंत ,विष्णू लाड, जयंद्रथ परब ,छोटु ढोलम, समिर रावले व सौ लाड मॕडम हे समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सिध्दी राउत च्या वतीने वडीलानी समाजाचे आभार व्यक्त केले.