लालपरीचा प्रवास महागणार?

मुंबई प्रतिनिधी: लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.14% भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाने सरकार पुढे ठेवला असून आता नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. दरवाढीचा हाच टक्का कायम ठेवल्यास आज असलेल्या 100 रुपयांच्या तिकिटामागे 15 रुपये जादा मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाने – भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

error: Content is protected !!