करूळ घाटात ट्रक कोसळला

बाप – लेकाचा मृत्यू

वैभववाडी : करूळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. करूळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी तसेच सह्याद्री जीव रक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग, रविंद्र सावंत, विजय सावंत, विजय पवार, रत्नकांत राशिवटे, रविंद्र चव्हाण, आनंद शिंदे, अमर शिंदे, रघुनाथ चव्हाण, गौरव मोरे, सागर पडवळ, सत्यविजय मोरे, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

तसेच भैरीभवानीचे मालक गिरीधर रावराणे व ग्रामस्थांनीही बचावकार्याला सहकार्य केले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!