
कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीसाठी ‘ विद्यार्थी ‘ हाच केंद्रबिंदू
कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ आयोजित SRS परीक्षा आज दि. 31 मार्च 2026 रोजी सुट्टीदिवशी म्हणजे महावीर जयंती दिवशी इयत्ता तिसरी व सहावीसाठी मोफत आयोजित करण्यात आली आहे. सदरच्या परीक्षेसाठी कुडाळ तालुक्यातून एकूण तिसरीचे 522 तर सहावीचे 212 विद्यार्थी बसलेले आहेत. आज सुट्टीच्या दिवशीही समितीच्या ध्येयधोरणानुसार कुडाळ तालुक्याने ' विद्यार्थी ' हा केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज केलेले आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली नैतिकता व संघटनेप्रती असलेली आपली निष्ठा सर्व समिती पाईक शिक्षकांनी आपल्या उपस्थितीने दाखविलेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका सचिव महेशजी गावडे यांनी दिली.
शिंपी - राॅड्रीक्स- समिती या नावाने (SRS परीक्षा) आयोजित ही परीक्षा मा. केंद्रप्रमुख आणि समितीचे सल्लागार आद. श्री. दिनकर तळवणेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली आहे. यावर्षी SRS परीक्षेचे दुसरे वर्ष असून यावेळी विशेषतः सुट्टीच्या दिवशी म्हणजेच महावीर जयंती दिवशी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील चार केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे. यामध्ये कुडाळ हायस्कूल, माणगाव हायस्कूल, भडगाव हायस्कूल व पणदूर हायस्कूल यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच सर्व समिती पाईक शिक्षक , परीक्षा केंद्रसंचालक , उपस्थित विद्यार्थी यांचे तसेच आद. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुडाळ यांनी परीक्षा आयोजनास परवानगी दिल्याने सर्वांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री. शशांक आटक यांनी मनापासून आभार मानले आहेत.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










