कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमेद अंतर्गत चालू केलेल्या स्वराज उत्पादक गटाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ


कुडाळ : चेंदवण येथील स्वराज उत्पादक गट प्रभागातील होतकरू महिलांसाठी प्रेरणादायी असून अध्यक्ष सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे कार्याला सलाम असे गौरवोद्गार प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्ने यांनी चेंदवण माऊली मंदीर जवळ स्वराज उत्पादक गट इमारतीचा शुभारंभ प्रसंगी काढले.

यावेळी स्वराज उत्पादक गट अध्यक्ष सौ .रश्मी देवेंद्र नाईक, सौ .सानिका परब (उपाध्यक्ष), सौ .शुभश्री श्रृंगारे(सचिव)प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्ने . कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर , शिक्षिका ज्योती पाटील मॅडम, सुप्रिया चेंदवणकर मॅडम ,ग्रामसखी सानवी चेंदवणकर , रेवती तोरसकर, साक्षी नाईक आणि चेंदवण गावातील सर्व ग्रामसंघ पदाधिकारी,सदस्य व महिलावर्ग उपस्थित होते.

जागतिक महिला दिनानिमित्त चेंदवण गावातील होतकरू महिलांच्या सक्षमीकरणासाठी माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून स्वराज उत्पादक गटाचा शुभारंभ कुडाळ नगराध्यक्ष सौ प्राजक्ता शिरवलकर यांचे उपस्थितीत करण्यात आला.यावेळी स्वराज उत्पादक गटाचे विविध उत्पादक वस्तू, साहित्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या अंतर्गत डिजिटल अवेअरनेस व आर्थिक साक्षरता या विषयावर सचिब सौ.शुभश्री शृंगारे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी डिजिटल बँकिंग मध्ये होणारे धोके आणि महिलांचे होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली.

महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम बहारदार

महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिध्द निवेदक बादल चौधरी यांनी अनोख्या शैलीत महिलांसाठीचा खेळ पैठणीचा कार्यक्रमात रंगत आणली.200 ते 250 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. गवस मॅडम यांनी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

error: Content is protected !!