
नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसील कार्यालयात धडक देत दिला इशारा
“देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी
गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुडवडा झाल्याने नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीत.गॅस सिलेंडरसाठी बुकींग देखील होत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. यांची गंभीर दखल माजी आमदार वैभव नाईक यांनी घेऊन कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कुडाळ तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच रिकामी सिलेंडर समोर ठेवून प्रभारी तहसीलदार अमरसिंह जाधव यांना जाब विचारण्यात आला. "देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर" अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. येत्या सोमवार पर्यंत गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवार दि.१७ मार्च रोजी हजारो नागरिकांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
गॅस सिलेंडरसाठी जिल्ह्यातील प्रत्येक एजन्सी मध्ये नागरिकांच्या मोठमोठया रांगा लागल्या आहेत. सरकारकडून २५ दिवसानंतर गॅस बुकींग होणार म्हणून सांगण्यात आले परंतु बूकिंसाठी असलेले फोन नंबरच बंद आहेत. ज्यांची बुकिंग झाली त्यांनाही गॅस सिलेंडर मिळत नाही. के.वाय.सी. साठी लोकांना ताटकळत रहावे लागत आहे. गृहिणी आणि भाडयाने, हॉस्टेलवर राहणारे मुले,मुली यांनी जेवण कशावर करायचे? व्यावसायिक सिलेंडर पूर्णतः बंद आहेत त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडले आहेत. त्यावर राज्य सरकारने काय उपाययोजना केली? अशा प्रश्नांची सरबत्ती वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. नागरिकांचे गॅस सिलेंडरसाठी काय हाल होत आहेत हे गॅस एजन्सीमध्ये आपण जाऊन बघा आणि ऑफलाईन गॅस बुकिंग सुरु करा अशी सूचना तहसीलदार यांना करण्यात आली. दरम्यान पुरवठा अधिकारी यांनाही वैभव नाईक यांनी फोन करून याचा जाब विचारला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जि.प.सदस्य रुपेश पावसकर, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगांवकर, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर,अतुल बंगे,काँग्रेसचे विजय प्रभू, अमित राणे,विनय गावडे, गुरू गडकर, संदीप म्हाडेश्वर, विभाग प्रमुख दिपक आंगणे, दिपश्री नेरुरकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
110
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
1
/
110



Subscribe










