भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हयातील आठही तालुक्यांमध्ये राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व राखले आहे.
या निवडीमध्ये भाजपने पाच तालुक्यांत आपले झेंडे फडकवले आहेत, तर शिवसेनेने तीन तालुक्यांत सभापती पदे पटकावली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतींची यादी
कुडाळ – मिलिंद नाईक (शिवसेना)
मालवण – प्रज्ञा चव्हाण (शिवसेना)
देवगड – गणेश राणे (भाजपा)
वैभववाडी – सिद्धेश रावराणे (भाजपा)
कणकवली – हर्षदा वाळके (भाजपा)
दोडामार्ग – पार्वती गवस (भाजपा)
सावंतवाडी – सुस्मिता जाधव (शिवसेना)
वेंगुर्ला – शंकर घारे (भाजपा)
कणकवली, देवगड, वैभववाडी या पट्ट्यात भाजपने आपली पकड मजबूत ठेवली आहे. विशेषतः सिद्धेश रावराणे आणि हर्षदा वाळके यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रात शिवसेनेने (शिंदे गट) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मिलिंद नाईक आणि प्रज्ञा चव्हाण यांच्या निवडीमुळे शिवसेनेला किनारपट्टीच्या भागात बळकटी मिळाली आहे.
नवनियुक्त सभापतींच्या निवडीनंतर जिल्हाभरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. आता या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला किती गती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


Subscribe










