खासदार नारायण राणे हाच माझा पक्ष; माझा विजय राणे साहेबांना समर्पित
संदेश उर्फ गोट्या सावंतांचा ५१९३ मताधिक्यानी दणदणीत विजय
कणकवली : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी ५१९३ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवित उबाठाचे उत्तम लोके यांचा दारुण पराभव केला. संदेश सावंत यांनी ६३१३ मते मिळवत उबाठा सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचा एकतर्फी पराभव केला. लोके यांना ११२० मते मिळाली. सावंत यांनी ५१९३ चे जिल्हयातील एक नंबर चे लिड घेत दणदणीत विजय संपादन करुन उत्तम लोके यांचा दारुण पराभव केला.
या मतदारसंघात एकूण ७५३० मतांचे मतदान झाले असून ९७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. संदेश सावंत यांनी ५१९३ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
यावेळी संदेश उर्फ गोटया सावंत म्हणाले की, हा विजय नाटळ मतदार संघातील माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि मायबाप जनतेचा विजय आहे.माझ्या मतदार संघातील मतदार नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.खासदार नारायण राणे हाच माझा पक्ष आहे.राणे साहेबांबरोबर गेली ३६ वर्षे प्रामाणिक पणे काम करत आहे.हा विजय नारायण राणे यांना समर्पित करतो.हा विजय भारतीय जनता पक्षाचा विजय आहे.खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामे करणार आहोत.माझ्या नाटळ मतदार संघातील जनतेने दिलेले प्रेम मी विसरु शकत नाही.यापुढे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.म्हणूनच नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेने ५१९३ एवढे विक्रमी मताधिक्य देत जिल्हा परिषदेत एक नंबर चे लिड देत पुन्हा एकदा नाटळ मतदार संघाने विक्रम रचला आहे.
या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नाटळ मतदारसंघात भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Subscribe









