डिगस माध्यमिक डिगस च्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत डिगस विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येकी विद्यार्थ्यास तीन हजार सहाशे रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुशांत सूर्यकांत चव्हाण अंजली अनंत पवार आर्या आबा धुरी ईशा चंद्रशेखर सावंत याना प्रधान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून त्याचा शिक्षणातील सातत्य टिकविण्यासाठी हातभार मोलाचा ठरणार आहे. मुख्याध्यापिका अनुजा सावंत यांनी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी संस्थेचे आभार मानताना सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा देणारी दीपज्योती आहे. आपल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे समाजाप्रती असलेले आपली बांधिलकी योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. संस्थाचालक व शिक्षकानी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन उज्वल यश संपादन करण्याचा निर्धार केला आहे.

error: Content is protected !!