उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
मुंबई प्रतिनिधी: राज्यात विधानसभा निवडणुकी नंतर जसे नवे मुख्यमंत्री कोण हा वाद आहे तसाच मंत्रिमंडळ स्थापनेचा सुद्धा वाद असल्याचं चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य, नाराजी ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या त्या सूचक वक्तव्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतील. आम्ही सगळे पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. लवकरच आपल्याला याचं उत्तर मिळेल. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर ते मंत्रीपदं कोणाला द्यायची हे ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं की, आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी. त्यानंतर मंत्र्यांची देखील जी नावं आहेत, ती लक्षात येतील”, असं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
महायुतीत कुठलेही मतभेद नाही…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत.. शिंदे साहेब, मी आणि अजितदादा आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही… निवडणुकीच्या पूर्वी ही आम्ही सांगितलं होतं की सर्व निर्णय सोबत बसून होतील.. आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील… त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार आहे.. त्यामुळे कोणाच्याही मनात काहीही किंतु परंतु असेल तर ते ही आज माननीय एकनाथ शिंदे यांनी दूर केले आहे. असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.













