नितेश राणे हिंदुत्वाची पेरणी करणारा नवा शिलेदार
रामराज शिंदे यांनी एक्स हॅण्डल वर दिली प्रतिक्रिया
कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत आ.नितेश राणे यांनी एकतर्फी विजय मिळवून विजयाची हॅट्रिक केली.आ.नितेश राणे यांच्या या यशाबद्दल रामराज शिंदे यांनी एक्स हॅण्डल वरा आ.नितेश राणे यांना भाजपाच्या विजयात नितेश राणे यांचा महत्वाचा वाटा आहे असे सांगितले आहे.
त्यांनी म्हंटले आहे,संपूर्ण निवडणूकीत नितेश राणे यांनी प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आणि त्याचा भाजपला फायदाही झाल्याचं दिसून आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे @NiteshNRane यांचा भाजपच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे. भाजपला नितेश राणेंच्या रूपानं कट्टर हिंदुत्वाची पेरणी करणारा नवा शिलेदार मिळाला आहे.